कोंढव्यातील संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू प्रकरणी बिल्डर अग्रवाला बंधूना पोलिस कोठडी

सोमवार, 1 जुलै 2019 (09:52 IST)
पुणे येथील कोंढव्यातील संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, सोबतच राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. यामध्बिये दोषी असलेले बिल्डर विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ जुलै २०१९ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कोंढवा बुद्रुक येथे आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. त्यावर भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटने प्रकरणी आल्कन स्टायलस लँडमार्कस या बांधकाम संस्थेचे भागीदार बिल्डर्स जगदीशप्रसाद अग्रवाल (६४), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (२७), विवेक सुनिल अग्रवाल (२१), विपूल सुनील अग्रवाल (२१) या ५ जणांबरोबर साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच शेजारी बिल्डिंग उभारणारे कांचन डेव्हलपर्स बांधकाम संस्थेचे भागीदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.सदर नमूद गुन्ह्यात आल्कन स्टायलस लँडमार्कस या बांधकाम संस्थेचे भागीदार बिल्डर विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना रविवार दिनांक ३० जून २०१९ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जुलै २०१९ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती