हिमाचल प्रदेशातील मनाली या पर्यटन शहरांतर्गत रंगरी-सिमसा मार्गावरील संध्या रिसॉर्ट हॉटेलमध्ये भीषण आग लागली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेलमध्ये राहणारे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीत पर्यटकांचे सामान जळून खाक झाले. प्रशासनाची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आहे. पर्यटकांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस तपास करत आहेत. मनाली आणि पाटलीकुहल येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांच्या पॉवर स्प्रे आणि तुल्लू पंपाचाही वापर केला जात आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील सुमारे 31 खोल्यांमध्ये पर्यटक थांबले होते.आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एसडीएमने सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नाही.