ममता बॅनर्जी यांची शरद पवारांच्या निवासस्थानी भेट

मंगळवार, 14 जून 2022 (22:10 IST)
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी २२ पक्षांची बैठक उद्या दिल्लीत बोलवली आहे.
 
ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु ममता बॅनर्जींनी बैठकीपूर्वी पवारांच्या ६ जनपथ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी ही निवडणूक लढवावी, अशी विनंती ममता बॅनर्जी त्यांना करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती