मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांना हा आदेश दिला. मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार केली आहे.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता नाही आणि त्या त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत नसल्यामुळे कोणताही प्रतिबंध लागू नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमासंदर्भात न्यायालयाने ही माहिती दिली.
न्यायालयाने म्हंटले आहे की व्हिडीओ क्लिप मध्ये दिसत आहे की, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत गाताना मधेच थांबल्या नंतर मंचावरून निघून गेल्या. त्यांनी असे करून राष्ट्रगीताचे अवमान केले प्रथम दर्शनी दिसत आहे .