सांगलीत 5 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (16:30 IST)
सांगलीच्या शिराळा तालुक्यात तडवळे गावात एक चित्त थरारक घटना घडली आहे. एका पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने तिथे काही मजुरांनी बिबट्याचा पाठलाग करत आरडाओरड केल्याने बिबट्याने मुलाला तिथेच सोडून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सध्या सर्वत्र उसतोडणीचे काम सुरु आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात तळवडे गावात देखील ऊस तोडणीचे काम सुरु असताना ऊस तोडणाऱ्या एका मजुराच्या उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने तिथेच खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. गणेश श्रीराम कांबिलकर रा. मानकुरवाडी जी. बीड असे या चिमुकल्याचे नाव आहे. बिबट्याने मुलाला आपल्या जबड्यात धरून पळण्याचा प्रयत्न केला. मुलाचे नशीब बलवत्तर असल्याने तिथे ऊस तोडणाऱ्या महिलांनी ते पहिले आणि आरडाओरड करायला सुरु केले असता काही मजुरांनी त्या बिबट्याचा पाठलाग केला . बिबट्याने मुलाला तिथेच सोडून पळ काढला. या प्रकरणात गणेश च्या मानेवर आणि हनुवटीवर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे गणेश हादरून गेला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती