मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आपल्या सरकारच्या भविष्यातील योजनांचा खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी सुमारे दीड लाख बेरोजगार तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हे आपल्या सरकारचे प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील विविध शासकीय तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आवश्यक सूचना शासनाने दिल्या आहे.