महाराष्ट्र: मामाने ठेवला नाही नात्याचा मान, भाचीचे केले लैगिक शोषण, न्यायालयाने 20 वर्षाची शिक्षा ठोठावली

मंगळवार, 9 जुलै 2024 (15:04 IST)
महाराष्ट्रात नात्याला दूषित करीत मामानेच भाचीचे लैगिंक शोषण केले. व तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यानंतर न्यायालयाने या आरोपीला 20 वर्षाची जेल सुनावली आहे.
 
ठाणे: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये न्यायालयाने लहान मुलीचे लैगिक शोषण केले म्हणून या प्रकरणात व्यक्तीला दोषी ठरवत 20 वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. न्यायालयाने सांगितले की,  अपराध भयंकर आणि घृणास्पद आहे.  
 
विशेष पॉक्सो न्यायायालयाच्या न्यायाधीश रूबी यू मालवणकर यांनी पाच जुलैला एका आदेशात सांगितले की 54 वर्षीय आरोपी ने ‘मामा’ या नात्याचा मान ठेवला नाही. मामाला लैंगिक शोषण, धमकी आणि पॉस्को अधिनियमच्या विभिन्न कलाम अंतर्गत दोषी ठरवले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पीडितेने 2018 मध्ये पोलिसात तक्रार दिली होती की, ती आपले वडील आणि भावांसोबत महाराष्ट्र मधील ठाणे जिल्ह्यामध्ये मानपाडा परिसरात राहत होती. त्या वेळी या मुलीचे 16 वर्षे होते.
 
ऑगस्ट 2017 मध्ये, अहमदनगर वरून तिचा मामा त्यांच्या घरी राहिला आला. काही दिवस तो चांगला राहिला. पण नंतर तो या पीडिताला वाईट स्पर्श करू लागला. घरी कोणी नसल्याचा फायदा हा आरोपी उचलत होता. पीडिताचे वडील दारू पिऊन झोपले असतांना या आरोपीने पीडिताचे लैगिंक शोषण केले व तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
 
जेव्हा या पीडितेने आरोपीला सांगितले की, ती वडिलांना सर्व सांगेल तेव्हा हा आरोपी त्याच्या घरी निघून गेला. या पिडीताच्या तक्रारी वरून पोलिसांनी 16 जून 2018 ला केस नोंदवली. न्यायाधीश आपल्या आदेशात म्हणाले की, आरोपी विरुद्ध सिद्ध झालेला अपराध खूप भयंकर आणि घृणास्पद आहे. व न्यायालयाने आरोपीवर 22,000 रुपयांचा दंड ठोठावला तसेच 20 वर्षाची जेल ही शिक्षा सुनावली. तसेच सांगितले की हा दंड पिडीताच्या पुनर्वसनसाठी दिला जाईल.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती