Maharashtra : 70,000 रुपए लाच घेण्याच्या आरोपाखाली FDA निरीक्षक सोबत 2 जणांना अटक

मंगळवार, 9 जुलै 2024 (13:40 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार रोधी ब्यूरो (एसीबी) ने मेडिकल दुकान उघडण्यासाठी एका व्यक्तीकडून 70,000 रुपए लाच मागण्याच्या आरोपाखाली खाद्य व औषध प्रशासन (एफडीए) च्या एक निरीक्षक आणि एक इतर व्यक्तिला अटक केली आहे. 
 
एका व्यक्तीने मेडिकल उघडण्यासाठी लाइसेंस मिळण्याकरिता  एफडीए जवळ आवेदन दिले होते. नवी मुंबई एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष पाटिल यांनी सांगितले की, एफडीएच्या एकऔषध निरीक्षक ने आवेदकला  लाइसेंस शुल्क व्यतिरिक्त एक लाख रुपयाची मागणी केली. व नंतर त्याने लाच रक्कम कमी करून 70,000 रुपए केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार आवेदक ने एसीबी मध्ये तक्रार नोंदवली, ज्यानंतर एसीबी जाळे टाकले आणि सोमवारी रात्री कल्याण शहरामध्ये किराणा दुकानाजवळ 50 वर्षीय एका व्यक्तीला तक्रारकर्त्याकडून  70,000 रुपए घेतांना पकडले. एसीबी अधिकारींनी नंतर आरोपीसोबत उपस्थित औषधी निरीक्षकला देखील पकडले. एसीबी ने सांगितले की दोघ आरोपींविरूद्ध भ्रष्टाचार निवारण अधिनियम नियम अंतर्गत कल्याणच्या एमएफसी पोलीस स्टेशनमध्ये केस नोंदवली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती