कोल्हापूर आणि सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. किणी, तासवडे टोल नाक्यांवर ही दरवाढ करण्यात आली आहे. 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत ही टोल दरवाढ असणार आहे. येत्या एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.
कोल्हापूर आणि सातारा या महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढीवर पाच रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कार जीप या वाहनांना जुना दर 75, नवा दर 80 असून हलक्या मालवाहतूक वाहनांसाठीजुना दर 135, नवा दर 145 रुपय आहे. तर ट्रक, बस आणि कंटेनरला जुना दर 265 रुपये असून नवा दर 290 आहे.