गणेशोत्सवापूर्वी जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (07:49 IST)
येत्या गणेशोत्सवापूर्वी उरण - पनवेल महामार्गावरील जासई उड्डाणपूलाची एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून पुलावरील वाहन भार(वजन क्षमता) चाचणी करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एन एच आय)ने दिली आहे.
 
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. मागील नऊ वषारपासून रखडलेल्या उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गा वरील जासई उड्डाणपूलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण करून यातील दोन मार्गिका वाहतु ीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एन एच आय) कडून अंतिम चाचणी शिल्लक आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असतांना पावसाने हजेरी लावल्याने पुलावरील डांबरीकरणाचे काम थांबले होते.
 
मात्र पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा जासई उड्डाणपूलाचे उर्वरीत काम पूर्ण करण्यात आले आहे. पुलावरील एका भागाचे काम पूर्ण झाले असून यात दोन मार्गिका तयार करून हा पूल येत्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय) चे सहव्यवस्थापक यशवंत घोटकर यांनी दिली आहे.
 
जासई उड्डाणपूल महत्वाचा: उरण पनवेल या राष्ट्रीय महामार्गावरील जासई उड्डाणपूल हा उरण मधील तसेच उरण परिसरात ये जा करणार्‍या प्रवासी व नागरीकांसाठी महत्वाचा आहे. मात्र येथील मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील नऊ वषारपासून रखडल्याने नागरीक आणि प्रवाशांना नियमितपणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती