मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या कांक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एक लेनो काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ दहा मीटरो काम शिल्लक आहे. तेही काम पूर्ण करून या आठवडाभरात संपूर्ण लेनवरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र डोंगराच्या बाजूने असलेला कातळ फोडण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे दुसऱया लेनो काम पावसाळ्यानंतरा सुरू होणार आहे.
गेल्या तीन वर्षापासून परशुराम घाटातील चौपदरीकरण सुरू आहे. एकीकडे 22 मीटर उंचीची दरड आणि दुसरीकडे खोल दरी व पायथ्याला गाव असल्याने अतिशय कठीण परिस्थितीत येथे काम करावे लागत आहे. खेड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनाया अखत्यारीत असलेल्या भागातील कामे शिल्लक आहेत, तर चिपळूण हद्दीत ईगल इन्फा कंपनीमार्पत काम सुरू असून त्यांया अखत्यारीत असलेल्या भागातील कामे पूर्णत्वास गेली आहेत. घाटातील डोंगर कटाईच्या कामातच वर्षभराचा कालावधी निघून गेला. त्यानंतर आता दरडीच्या बाजूने सरंक्षक भिंत व चौपदरीकरणातील कॉक्रिटीकरणाचा कामही टप्प्या-टप्प्याने करण्यात आले. त्यातील एका लेनो काम पूर्णत्वाकडे गेले असून केवळ 10 मिटरचे कॉंक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे. एक-दोन दिवसात हे काम पर्ण करून आठवडा भरात ए लेन मार्गावरील वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱया मार्गावर कॉंक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परशुराम घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळाचा भाग दोन ब्रेकरच्या साहाय्याने तोडण्याचे काम सुरू आहे. बहुतांशी कातळ तोडला असला तरी अद्याप रस्त्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. तसेच गटार व संरक्षक भिंतीचे कामही शिल्लक आहे. त्यातच आता पावसाळा येऊन ठेपल्याने चौपदरीकरणाची घाई सुरू झाली आहे. परंतु कातळ फोडण्यासाठी केवळ एकच ब्रेकर सद्यस्थितीत उपलब्ध आहे. त्यामुळे या कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. मध्यंतरी दहा दिवस परशुराम घाटातील वाहतूक दिवसातून 8 तास बंद ठेवण्यात आली होती. परंतू या कालावाधीतदेखील खेड हद्दीतील कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. अजूनही कामासाठी पुरेशी यंत्रणा न लावल्याने मंदगतीने कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही चौपदरीकरणातील कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यांच्या सूचनांचा अद्यापही प्रभाव झालेला दिसत नाही.