बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 199 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर होत तात्काळ संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी हे आदेश काढले असून जिल्ह्यात आता एकप्रकारे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे आदेश निघाल्या निघाल्या तात्काळ पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.