बुलढाणा जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु

शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (18:03 IST)
बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.  यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
 
जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती