मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम आणि शहाजी या भावांचे गावातील भटकी नावाच्या शिवारात शेत असून या ठिकाणी विहीर देखील आहे. या विहिरीच्या जवळ असलेला फ्युजबॉक्स मधून वीज पुरवठा होत असून शुक्रवारी दुपारच्या वेळेला ते विहिरीतून शेतात पाणी देण्यासाठी गेले असता ते घरी परतले नाही.
त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधला असून दोघांचा फोन लागत होता मात्र त्यांच्याशी काहीच संभाषण झाले नाही तर संध्याकाळी तुकाराम खोचरे यांचा मुलगा त्यांना शोधायला गेला असता त्यांना ते दोघे फ्युजबॉक्स जवळ निपचित पडलेले दिसले. मुलांनी ही माहिती कुटुंबियांना दिली. नंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले नंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पाण्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविले. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.