मा. कुलगुरु यांनी पुढे सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना. श्री. अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात युक्रेनहून परतणाÚया वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये त्यांना कशी मदत करता येईल याबाबतीत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा असे सांगितले होते. यादृष्टीने विद्यापीठातर्फे
www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाव्दारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरुन पाठवायची आहे.