गिरीश यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

गुरूवार, 15 जुलै 2021 (22:58 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आठवड्यात अटक केली होती. विशेष न्यायालयाने गिरीश यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. दरम्यान, ईडीने त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आली आहे.
 
ईडीने गेल्या आठवड्यात मंगळवारी गिरीश यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली होती. 
 
गिरीश चौकशीस सहकार्य करत नाहीत, प्रकरणाशी संबंधित माहिती ते दडवत आहेत, अशी माहिती ईडीने न्यायालयाला दिली होती. ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. 
 
पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीआधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती