अभिनेत्री बनली राजकारणी नवनीत राणा, वादांशी संबंधित नवनीत राणा एक चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. नवनीतने हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी भाषेतील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19,731 मतांनी पराभव केला.