वृद्ध रुग्णाचा लाखोंचा माल चोरल्याप्रकरणी परिचारिकेवर गुन्हा दाखल

मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (10:13 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका वृद्ध रुग्णाच्या 2.21 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी एका परिचारिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी परिचारिके विरुद्ध गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर 74 वर्षीय महिलेची काळजी घेण्यासाठी तिला नर्सिंग ब्युरोद्वारे नियुक्त करण्यात आले होते.   

तसेच महिलेची काळजी घेत असताना तिने पीडितेचे लक्ष विचलित करून घरातून रोख रक्कम आणि सोने चोरले, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती