छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील छिंदकालो गावातील आनंद यादव असे कोंबडीचे पिल्लू गिळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हा तो अंघोळ करून परतला तेव्हा त्याला चक्कर येऊ लागली. यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतरच त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या गळ्यातील एक कोंबडीचेपिल्लू काढले.