गडचिरोली : गरोदर महिलेचा जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मधून पोहचवले रक्त

गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (11:36 IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील भामरागढ तालुक्यात परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक रस्ते बंद झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान एका गरोदर महिलेची अवस्था गंभीर झाली होती. व तिला रक्ताची गरज असताना या महिलेचा जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मधून रक्त पाठवण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पूरपरिथितीमधून निघून एका गरोदर महिलेची मेडिकल टीम ने डिलिवरी केली. त्यावेळीस तिला रक्त चढवण्याची गरज होती. पण पुरामुळे रस्ते बंद झाले होते. दरम्यान सकाळी हेलिकॉप्टरने या महिलेसाठी रक्त पोहचवण्यात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मंतोषी गजेंद्र चौधरी भामरागढ रुग्णालयात दाखल होती. इथे डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली पण तिला रक्ताची गरज होती. या महिलेला एक बॅग ब्लड तर मिळाले पण आणखीन ब्लाडची आवश्यकता होती. या करिता हेलिकॉप्टरने ब्लडची सोय करण्यात आली. ज्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती