काय म्हणता, रूग्ण वाहिकेची वाट बघून वैतागले म्हणून कोरोना रूग्ण गावात फिरून आले

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (22:08 IST)
राज्यातल्या वैद्यकिय यंत्रणेचा  हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. बीड जिल्ह्यात रूग्णवाहिके अभावी एका रूग्णाला तब्बल १२ तास ताटकळत उभे रहावे लागले. आणि आणखी धक्कादायक बाब म्हणजे रूग्ण वाहिकेची वाट बघून वैतागलेले म्हणून ५ रूग्ण गावात मुक्त संचार करताना दिसले.
 
बीड जिल्हातील लिंबागणेशमध्ये हा प्रकार घडला. रात्री अकरा वाजता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पाच रुग्णांना तब्बल १२ तास ताटकळत बसावे लागले. अखेर १२ तासांनी या रूग्णाला रूग्णवाहिका मिळाली. तर आणखी बीड मधील ५ रूग्णांना रूग्ण वाहिका उपलब्ध न झाल्यामुळे कंटाळलेल्या त्यांनी गावात भटकायला सुरूवात केली.
 
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका फक्त सहा आहेत. त्यामुळे रुग्णांना एकत्रित हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाते. रुग्णवाहिका कमी असल्यामुळे जिल्ह्यातील  रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास उशीर होत असल्याचे आरोग्य यंत्रनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती