ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्द बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. गनिमी कावा ही शिवकाळातील युक्ती त्यांनी आपल्या संघर्षासाठी उपयोगात आणली. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.
ब्रिटिश शासनाने त्यांच्या अटकेसाठी बक्षीस घोषित केली. 1870- 78 दरम्यान पडलेल्या दुष्काळात शेतकर्यांच्या दयनीय परिरिस्थतिविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. आपल्या तडफदार भाषणातून त्यांनी स्वातंत्र्याची सिंहगर्जना केली. आमसभांच्या माध्यमातून त्यांनी देशाची हलाखीची स्थिती देशवासीयांसमोर मांडली.त्यांना लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जाते.
स्वातंत्र्यच सर्व समस्यांचे समाधान असल्याचे त्यांचे मत होते. विजापूर जिल्ह्यात 20 जुलै1879 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पुण्यात तीन नोव्हेंबर 1879 रोजी राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यांना जन्मठेप झाली. तुरूंगात असतानाच 17 फेब्रुवारी 1883 रोजी क्षय रोगाने त्यांचे निधन झाले. भारतीयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत जागवण्याचे महान कार्य त्यांनी केले.त्यांना मान वंदना देण्यासाठी त्यांचा स्मारक स्तंभ शिरढोण येथे उभारला आहे.