या घटनेची माहिती देतांना मुंबई पोलिसांनी सांगितले की, 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला कुर्ला परिसरातील एका धार्मिक स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीला वेदना होऊ लागल्यावर तिने आईला ही माहिती दिली.
तिच्या आईने मुलीला तातडीने रुग्णालयात नेले आणि तिथे तिला प्राथमिक उपचार दिले. आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांचे एक पथक घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे आणि पुरावे गोळा करत आहे.