मध्य प्रदेशात दूषित कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने देशभरातील आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहे. मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दोन सदस्यांचे पथकही नागपुरात दाखल झाले. मृत्यूचे कारण तपासले जाईल आणि इतर माहिती गोळा केली जाईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, मंगळवारी एम्सच्या पथकाने वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. पथकाने रुग्णांच्या उपचारांच्या कागदपत्रांची तपासणी केली आणि दाखल झालेल्या रुग्णांच्या उपचारांची माहिती गोळा केली. बुधवारी, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सह-संचालक डॉ. आरती तिवारी आणि डॉ. नवीन वर्मा नागपुरात पोहोचले. ते मेडिकल हॉस्पिटल, एम्स आणि विविध खाजगी रुग्णालयांचीही पाहणी करतील आणि माहिती गोळा करतील. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बैतुल आणि सिवनी येथेही हे पथक भेट देणार आहे.