महाराष्ट्रातील जालना येथील शनिवारी एका बांधकाम साइटवर तात्पुरत्या 'शेड'मध्ये झोपलेल्या पाच कामगारांवर ट्रकमधून वाळू पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जीव गमावलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. या संदर्भात, एका अधिकाऱ्याने सांगितले की, जाफराबाद तहसीलमधील पासोडी-चांडोल येथील एका पूल प्रकल्पाच्या ठिकाणी पहाटे ही घटना घडली.
त्यांनी सांगितले की, बांधकामाच्या ठिकाणी एका तात्पुरत्या शेडमध्ये कामगार झोपले होते, तेव्हा चालक वाळूने भरलेला टिपर ट्रक घेऊन तिथे आला आणि नकळत सर्व वाळू शेडवर सांडली, ज्यामुळे कामगार त्याखाली गाडले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूच्या वजनामुळे शेड कोसळला, व कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. अशी माहिती समोर आली आहे.