राज्यात दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून कॉपीमुक्त मोहीम सुरु केली. पण यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी आणि महागावच्या परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला.त्यामुळे दोन्ही परीक्षा केंद्रावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले.
मुख्यमंत्र्यांनी फसवणूक करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि फसवणूकीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत, परीक्षा केंद्रात झालेल्या पेपरफुटीला महागाव शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी, केंद्र संचालक आणि संस्था संचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.