या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडून आणि घटना स्थळावरून मिळालेली आधिक माहिती अशी की शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मुंबई पोलिसदलामध्ये आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आले होते. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांच्या मृत्यू झाला.