सांगलीत अंडरगारमेंट, नॅपकीन्स, पॅड या वस्तूंची मागणी मनसे ने केली आहे

सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (16:57 IST)
प्रत्येक घरात चिखलाचा खच झाला आहे. तर घरातील सर्व गृहपयोगी वस्तू नष्ट झाल्या असून, आता सुरुवातीला घर साफ करण्यासाठी अनेक वस्तू हव्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक गोष्टींमध्ये ट्युबलाईट, बल्ब, रोगराईपासून बचावासाठी मास्क, खराटे, फिनेल, प्लास्टीकच्या वस्तू. रोगराई पसरु नये यासाठी अंडरगारमेंट, नॅपकीन्स, पॅड या वस्तू अत्यंत आवश्यक आहेत, असे सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. 
 
राज्यभरातून कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला मदत येत असून. पूर्ण महाराष्ट् मदतीला पुढे येतो आहे. मदतीचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. पण, नेमकी गरज कशाची हवीय? हेही मदत देणाऱ्या बांधवांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. एकाच प्रकारची मदत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरातून येत आहे. तर, ग्रामीण भागातूनही याच प्रकारची मदत येते आहे. मात्र येथे  गहू, तांदुळ, साखर या किराणा मालाची गरज तर आहेच, पण सध्या गरज आहे ती आरोग्याकडे लक्ष देण्याची. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वच्छतापूरक वस्तूंची सध्या गरज असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही मदत करत असाल तर आरोग्याला प्राधान्य द्या आणि मदत पाठवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती