प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे असे अॅड. पाटील यांचे म्हणणे आहे.
रश्मी ठाकरे यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
Photo: Twitter