इंडिया ते इंडोनेशिया ही तब्बल 5900 की.मी. सायकल मोहीम शंभर दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. सायकलवर ते व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या सहा देशात भेट देणार आहेत. तेथील संस्कृती, पर्यटनस्थळ याचा अभ्यास करत संपूर्ण प्रवास ते सेल्फ सपोर्टेड करणार आहेत.
नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे प्रणेते हरीश बैजल त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झालीयावेळी सातपूर सभापती तथा माजी नगरसेवक संतोष गायकवाड, शिवसेना माजी गटनेते विलास शिंदे, भीमराव कडलग, महेश हिरे, अरुण काळे, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किशोर काळे, विशाल उगले, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, इतर सायकलिस्ट तसेच आनंदवली येथील समस्त ग्रामस्थ, गायकवाड परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.