सप्तशृंग गड मंदिर परिसरात कोरोनाचे निर्बंध लागू

शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (20:46 IST)
देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत. ही बाब ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर कोरोना नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गड मंदिर परिसरात कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तशी घोषणा मंदिर देवस्थानने केली आहे.
 
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट ने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भीय सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे आवश्यक आहे. या हेतूने मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्दी टाळणे बाबत जाहीर आवाहन करत आहे. २३ डिसेंबरपासून भाविकांनी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त सूचनेनुसार विश्वस्त संस्थेच्या व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे. मास्कचा वापर करूनच श्री भगवती दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश करावा. गर्दी टाळणे हेतूने सामाजिक अंतराचे पालन करावे. बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती