पोलिसांनी सांगितले की, कल्याणमधील एक मुलगी अनेक दिवसांपासून कौटुंबिक समस्यांशी झुंजत होती. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी या मुलीला तिच्या नातेवाईकांनी आंबिवलीतील एका बाबाचा पत्ता दिला होता. आंबिवलीचा हा बाबा कौटुंबिक कलह दूर करून घरात सुख-शांती आणतो, अशी माहिती या मुलीला मिळाली. या माहितीच्या आधारे पीडितेने तिच्या नातेवाईकांसह आंबिवली येथील बाबा अरविंद जाधव यांच्याकडे जाऊन आपली व्यथा सांगितली. त्यानंतर बाबांनी मुलीला सांगितले की तुझी समस्या दूर होईल पण तुला काही काळ इथेच राहावे लागेल.
बाबा म्हणाले, तुझ्या घरच्यांना बाहेर जाऊ दे, तू इथेच थांब. मी तुझी नजर काढून टाकीन. असे म्हणत भोंदू बाबाने या मुलीच्या अंगाला हात लावायला सुरुवात केली. बाबा आपल्याला वाईट स्पर्श करत असल्याचे मुलीच्या लक्षात येताच मुलीने त्याला हात लावण्यास नकार दिला. ती मुलगी म्हणाली की सगळ्यांना सांगेन बाबा माझ्यासोबत काय करत आहेत? त्यावेळी भोंदू बाबाने मुलीला अशी धमकी दिली की, अशी माहिती कोणाला दिली तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.