Maharashtra Marathi Breaking News Live Today: या वर्षात मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण १९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण 278 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी अवैध घुसखोरांवरही मुंबई पोलीस कारवाई करत आहे. गेल्या तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागातून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.