वारीस पठाण देशद्रोही आहेत, मुस्लीम संघटनांनी नोंदवला निषेध

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (17:13 IST)
एमआयएमचे वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शीरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेने केली आहे. मुजफ्फरपूर, येथील कंपनी बाग रोडवरच्या हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांचा पुतळाही जाळला. वारीस पठाण देशद्रोही आहेत असं हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध मुस्लीम संघटनांनीही नोंदवला आहे. तुम्ही ज्या १५ कोटी मुस्लिमांमध्ये आम्हाला घेऊ पाहात आहात ते आम्ही नाही असंही काही मुस्लीम बांधवांनी म्हटलं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती