वारिस पठाण यांच्यावर कारवाई, माध्यमांवर बोलण्यास बंदी

शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (16:52 IST)
एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्यावर कारवाई केली आहे. वारिस पठाण यांना माध्यमांवर बोलण्याची बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी वारिस  पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितले. 
 
 “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. 
 
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास वारिस पठाण यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती