मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वर इथे सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी पडल्याने, लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णालेक,लिंगमळा परिसरात पारा 3 अंशावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वरमध्ये पारा वेगाने खाली उतरला आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील सुमारे 2 किलोमीटरच्या पट्ट्यात किमान तापमान 3 अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरलं. यामुळे त्याभागातील दवबिंदू गोठून हिमकण मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या भागात गाडीच्या टपावर, शेतातील गवतावर,वेण्णालेक परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पहायला मिळाले.