एक हजार कोटी रुपये किंमतीचे शंभर किलो ड्रग्‍ज जप्त

मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक हजार कोटी रुपये किंमतीचे शंभर किलो ड्रग्‍ज या पथकाने जप्त केले आहे. मुंबईतील वाकोला परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी एका संयुक्‍त कारवाई केली आहे.  या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. 
 
अमेरिकेत बंदी असलेल्‍या आणि हजारो लोकांच्या मृत्‍यूचे कारण बनलेल्‍या फेंटानिल या ड्रग्‍जची मुंबईतून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्‍याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याला खबऱ्या मार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून अमली विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी छापा टाकला. यात सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि धन:श्याम तिवारी या चौघांना अटक करून पोलिसांनी त्‍यांच्याकडून शंभर किलो ड्रग्‍ज जप्त केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती