थंडीचा कहर : निफाड राज्यात सर्वात थंड १.८ सेल्सिअस तपमानाची नोंद

राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले शहर म्हणून निफाड नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील क्रुषी संशोधन केंद्रावर १.८ अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. 
 
तर तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या उगांव शिवडी सोनेवाडी भागात द्राक्षबागांत दवबिंदुंची बारिक बर्फाची झालरं तयार झाली होती. सकाळी हवामान केंद्राकडून शहराचे किमान तापमान ५.७ अंश मोजण्यात आले आहे.
 
मागील पंधरा दिवसात थंडी वाढली आहे. मात्र कमी तपमान असतांना अचानक १२.६ अंश नोंदवले गेले होते. तर अचानक पुन्हा पारा घसरला आणि तपमान ५.७ नोंदवले गेले आहे.
 
मागील पंधरवड्यापासून शहरात थंडीचा जोर वाढलेला होता. बुधवारी  दि.१९ हे  ७.९ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. गुरूवारी पारा पुन्हा अचानक वेगाने १२.६ अंशावरून थेट ५.७ अंशापर्यंत खाली घसरला.  बुधवारी संध्याकाळपासून वेगाने थंड 
 
वारे वाहू लागल्याने नाशिककर गारठून गेले होते. रात्री या थंड वाऱ्याचा वेग अधिकच वाढल्याने किमान तपमान अचानकपणे खाली कोसळले. त्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आलेल्या शीतलहरीमुळे पुन्हा गुरूवारी कमाल, किमान 
 
तपमानात मोठी घसरण झाली. तीशीपार गेलेले कमाल तापमना थेट २६अंशापर्यंत खाली आले.
 
मागील वर्षी ७.५ अंश इतक्या तापमानाची नोंद डिसेंबरअखेर झाली होती. यावर्षी थेट ५.७ इतकी नोंद झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा कडाका प्रचंड जाणवत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती