इयत्ता १० वी चा निकाल आज

सोमवार, 27 मे 2024 (09:56 IST)
आज दुपारी 1 वाजता इयत्ता 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार आहे. तसेच 10 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल कुठे व कसा पाहता येईल. याची माहिती पुढील प्रमाणे 
 
आज दुपारी 1 वाजता इयत्ता 10 वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा इयत्ता 10 वी चा निकाल आज जाहीर होणार आहे. 10 वी ची निकालाची लिंक दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. 
 
तसेच खालील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थी त्यांचे इयत्ता 10वीचे निकाल  mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org  तसेच विदयार्थी महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, ऑफलाइन मोडमध्ये देखील पाहू शकतात. तसेच काही वेळेस निकाल पाहतांना वेबसाइडवर समस्या निर्माण होते. तर आपला वेळ वाचवण्यासाठी हा पर्याय निवडू शकतात. 
 
तसेच गेल्या वर्षीची उत्तीर्ण टक्केवारी 93. 83 टक्के दहावीच्या निकालाची नोंदवली गेली होती. मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का 2022 च्या तुलनेत 3.18 ने घसरला होता. तसेच गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात आता तुलनेत वाढ झाली आहे. तसेच आता 10 विच्या निकालात अशीच प्रगती दिसणार आहे का? हे आता गेल्या काही तासांमध्ये समजेल. 

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती