बुरखाधारी महिलेचा खतरनाक बाइक स्टंट, व्हिडिओ व्हायल

Webdunia
शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (11:56 IST)
सोशल मीडियावर दररोज काही वेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशात राज्यातील भिवंडी येथून एका धोकादायक बाइक स्टंटचा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत बुरखा घातलेली एक महिला बाइकवर स्टंट करताना दिसत आहे. 
 
महिला मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर टाकीवर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करत पुढे जात आहे. या घटनेचा पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला. 
 
 
आता हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख