मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ येथून 35 ते 40 प्रवाशांना घेऊन खासगी बस हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. तर विरुद्ध दिशेने नागपूरहून 25 ते 30 प्रवाशांची बस येत होती. या दोन्ही बसची धडक समोरासमोर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे. तर सहा प्रवाशी जागीच ठार झाले. दोन्ही बस मधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहे.