मंत्रिमंडळ विस्तारासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते नागपुरात पोहोचले आहेत. दरम्यान, भाजप नेत्या माधुरी मिसाळ याही मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपुरात पोहोचल्या आहेत. माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, त्यांचेही नाव कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत असून त्या देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी, भाजप नेत्या माधुरी मिसाळ म्हणाल्या, “मला नुकतेच कळले की माझे नाव देखील यादीत आहे (नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत). दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. आपल्या सरकारने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी देईल ती मी पार पाडेन.
यावेळी शिवसेनेतील या 6 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. या मंत्र्यांमध्ये मराठवाड्यातून संजय शिरसाट, रायगडमधून भरतशेठ गोगावले, कोकणातून योगेश कदम, विदर्भातून आशिष जैस्वाल, पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश आबिटकर आणि ठाण्यातून प्रताप सरनाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचे झाले तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांची नावे पुढे आहेत. दुसरीकडे भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.