शपथविधी समारंभानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही बातमी आली नव्हती, त्यावरून विरोधक महायुतीवर सातत्याने टीका करत होते. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख उघड झाली आहे. यादरम्यान नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 15 डिसेंबरला नागपुरात 30 नवीन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ स्थापनेसाठी एकनाश शिंदे आणि अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. पवार यांच्या दक्षिण मुंबईतील देवगिरी बंगल्यावर त्यांनी चर्चा केली, तिथे त्यांनी नेत्यांचीही भेट घेतली.