नाना पाटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची खर्गे यांना मागणी

शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (17:45 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काही दिवसानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये सम्मेलीत झालेल्या काँग्रेस पक्षाने विधानसभेत 101 जागा लढवला त्यापैकी त्यांना फक्त 16 जागा मिळाल्या. महाराष्ट्रात काँग्रेसची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. नानापटोले हे स्वत: भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून मात्र 208 मतांनी विजयी झाले. 
निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने दु:खी झालेल्या नाना पटोले यांनी खरगे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची मागणी केली.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाला संघटनात्मक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती