महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज नागपुरात शपथविधी सोहळा होत असून, त्यात महायुतीचे नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे कोणाला कोणते मंत्रीपद मिळाले, हे आज समोर येणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेते सामील झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री समाविष्ट केले जाऊ शकतात. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, यावेळी भारतीय जनता पक्षाला 20 ते 21 पदे मिळू शकतात. राष्ट्रवादीचे अजित पवार यांना 9 ते 10 मंत्रीपदे तर एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेला 11-12 मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकूण २८८ मतदारसंघांपैकी २३० जागा मिळाल्या. भाजपने 132 जागा जिंकल्या, तर त्यांचे मित्रपक्ष - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या.