सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रत्युत्तर

सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:32 IST)
खासदार सुप्रिया सुळे यांनी “भाजपा हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लाँड्री झाला आहे”, असे विधान केले होते. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे, असे ते म्हणाले.
 
काय म्हणाले कपिल पाटील?
“आपल्याला आठवत असेल तर २०१९ च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती. भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? खरं तर राजकारणात अशी स्थित्यंतरं येत असतात, जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे”, असे प्रत्युतर कपिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे.
 
Edited By - Ratandeep Ranshoor  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती