एसपी महेश्वर रेड्डी यांनी एएनआयला सांगतिले की 31 डिसेम्बर 2024 रोजी रात्री 11 वाजता पाळधी गावात रोडरेंजची घटना घडली. या वेळी सुमारे 100 ते 150 लोकांचा जमाव झाला.नंतर हाणामारी झाली आणि वातावरण बिघडले. काही लोकांनी दगडफेक केली आणि दुकाने पेटवली. तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शांतता स्थापित केली.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात दोन एफआयआर निंदवले आहे. त्याच दिवशी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी नंतर आणखी आठ जणांची ओळख पटवली असून ते पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. गावकऱ्यांशी संपर्क साधलांनंतर त्यांनी अशी घटना पुन्हा घडू नये असे मान्य केले आहे. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 अंतर्गत निर्बंध हटवण्यात आले आहे.