सरकार या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पण, या घटनेला जातीय रंग देण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. मला वाटते महाराष्ट्रातील जनता हुशार आहे आणि राहुल गांधींच्या या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. संविधानाप्रती राहुल गांधी आणि काँग्रेसची विचारधारा काय आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. संविधानाला मान देण्याचे काम आम्ही करत आहोत.
राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी राहुल गांधींनी अद्याप आपला अजेंडा ठरवायचा नसल्याचं म्हटलं आहे. ते समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता त्यांची खोटी कहाणी चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना संपवले. महाराष्ट्रात काँग्रेसचा ज्या प्रकारे पराभव झाला, त्यातून धडा घेतला पाहिजे, असे मला वाटते. या पराभवाचा राहुल गांधींनी विचार करायला हवा.