कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ , सत्तारांविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल

रविवार, 1 जानेवारी 2023 (11:11 IST)
गायरान जमीन प्रकरण, सिल्लोड कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह एकूण पाच जणांनी या प्रकरणी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.
 
सत्तार यांच्याविरोधात तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.
 
सत्तार यांनी जमिनी कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.
 
वाशिम जिल्ह्यातील एका गायरान जमिनीचं प्रकरण आणि कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याच्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
 
सत्तार यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे.
 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला .श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी याबाबतची जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली.
 
अब्दुल सत्तार यांनी17 जून 2022 रोजी 37 एकर गायरान जमीन योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कोणत्याही कायदेशीर बाबींचे पालन केले गेले नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला असून यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या वरून गदारोळ झाला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
 
 Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती