महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी नारायण राणेंनी भेट घेतली. नारायण राणे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी जवळपास दीड तास या दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही काळ नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांच्या गॅलरीत गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन नेत्यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.